आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
लालवंडी येथे ‘सबसॉइलर’ व पीक अवशेष व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; खरीपपूर्व मोहिमेचा आढावा
नांदेड | बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत, उत्पादनक्षम आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी Rahul Kardile यांनी केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील मौजे लालवंडी येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प (BCRC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. गित्ते,...
