जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई| जपानी मेंदूज्वरासारख्या धोकादायक संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करत या आजारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत लसीकरण मोहीम सुरू असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या उपाययोजनांमुळे सध्या रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.
आजाराचे स्वरूप आणि धोका
जपानी मेंदूज्वर हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून तो मेंदूवर परिणाम करतो. यात झटके येणे, न्यू...
