रेती वसुली प्रकरण पेटले; महाराष्ट्र दिनीच आमरण उपोषण सुरू
छत्रपती संभाजीनगर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून रेतीसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून सुरू असलेला वाद आता तीव्र झाला असून, १ मे महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. तक्रारदार अशोक रामराव हिवराळे आणि साईनाथ गंगाधर पांढरे यांनी आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी, येजगी, गंजगाव, हुणगुंदा व बोळेगाव येथील रेती घाटांवर अवैध उत्खनन व घरकुल लाभार्थ्यांकडून बेकायदेशीर वसुली होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणी अनेक वेळा वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची क...
