प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.
हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्र...
