Tag: राष्ट्रीय महामार्गावरील टोल

हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे संताप; रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंदची मागणी

हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे संताप; रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंदची मागणी

राजकारण
हिमायतनगर| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, रस्ता दुरुस्त न करता टोल वसुली सुरू ठेवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर युवती सेना जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, हिमायतनगर ते सरसम दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवडही करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांत या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असून, सुमारे 10 ते 15 जणांना जीव गमवावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक नागरिक कायमस्वरूपी जखमी किंवा अपंग झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्...
भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याविरोधात नागरिकांचा संताप

भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याविरोधात नागरिकांचा संताप

राजकारण
सुविधा नसताना वसुलीचा आरोप भोकर/हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 अ वरील भोकर–हिमायतनगर मार्गाची दुरुस्ती न करता तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड न करताच सोनारी फाटा येथे टोल नाका सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था दयनीय असूनही टोल आकारला जात आहे. काही ठिकाणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून फोनपेच्या माध्यमातून पैसे मागितले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ‘चेकिंग’च्या नावाखाली त्रास दिला जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ता दुरुस्त होईपर्यंत आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत टोल वसुली ...
error: Content is protected !!