हिमायतनगरात निकृष्ट नाली बांधकामावर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; काम बंद पाडले
अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार काम झाले तरच पुढे काम करू देऊ, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू - पाटील
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत ठेकेदाराचे काम थेट बंद पाडले. अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही कामात सुधारणा न झाल्याने हा संघर्ष उफाळून आला.
https://www.youtube.com/watch?v=4tTBXMy_cNE&t=4s
माहितीनुसार, सुमारे 295 कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप वारंवार होत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून काम थांबवण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते घटनास्थळी भेट देऊन अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करण...


