Tag: यांचे निधन

हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील योगी पीठाचे मानद योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने योगसाधना क्षेत्रासह हिमायतनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता लकडोबा चौक येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजई, मुलं, असा मोठा परिवार आहे. योगसाधना आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत. स्व. परमेश्वर पानपट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏...
हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता हेंद्रे (ढेकळे) यांचे गुरुवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात व समाजबांधवांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दत्ता हेंद्रे यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने माळी समाजासह हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, नातू, पंतू असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 29 मे रोजी दुपारी 12 वाजता हिंदू स्मशान भूमी, लाकडोबा चौक, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
सेवानिवृत्त शिक्षक कै. रामजी संभाजी हरडपकर यांचे निधन

सेवानिवृत्त शिक्षक कै. रामजी संभाजी हरडपकर यांचे निधन

सामाजिक
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार हिमायतनगर| येथील सेवानिवृत्त शिक्षक कै. रामजी संभाजी हरडपकर (गुरुजी) यांचे रविवारी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. ते नगरपंचायतीचे लिपिक बालाजी हरडपकर तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख गजानन हरडपकर यांचे वडील होत. शांत, मनमिळावू व विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा असलेले शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ४ वाजता लकडोबा चौक येथील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. रामजी संभाजी हरडपकर यांच्या निधनाने हरडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे....
error: Content is protected !!