Tag: माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा थरारक विजय

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा थरारक विजय

राजकारण
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हिमायतनगर गटातून शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. या विजयामुळे हिमायतनगरसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या अटीतटीच्या लढतीत माधवराव पाटील जवळगावकर यांना ११ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल राठोड यांना १० मते मिळाली. केवळ एका मताच्या फरकाने लागलेल्या या निकालाने निवडणुकीची चुरस अधोरेखित केली आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी जवळगावकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सम...
आषाढी महोत्सवानिमित्त माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे श्री परमेश्वर मंदिरात दर्शन

आषाढी महोत्सवानिमित्त माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे श्री परमेश्वर मंदिरात दर्शन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात आषाढी एकादशी व आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढीच्या पार्श्वभूमीवर हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरातील धार्मिक परंपरा व आषाढी महोत्सवाच्या नगरप्रदक्षिणा दिंडी व इतर आयोजनाबाबत श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी चर्चा केली. श्री परमेश्वर मंदिराला भेट देत त्यांनी भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, सुभाष शिंदे, पाळजकर काका, राजू जयस्वाल, ज्ञानेश्वर शिंदे, पवन गुंडेवार, आनंद मुतनेप...
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल

राजकारण
समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मंगळवारी (दि. ३० जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत संचालक मंडळाचे सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी समर्थकांनी एकत्रित शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सहकार क्षेत्रासह राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष...
error: Content is protected !!