बालविवाहाच्या प्रश्नावर मराठवाडा देशात आघाडीवर- हेरंब कुलकर्णी
नांदेड,गोविंद मुंडकर| सामाजिक प्रगतीच्या अनेक मापदंडांवर मराठवाड्याची ओळख ठळकपणे समोर येत नसली, तरी बालविवाहाच्या समस्येत हा प्रदेश देशात गंभीरपणे आघाडीवर असल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषद आणि आयआयबी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
देशातील सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, यातील १७ जिल्हे महाराष्ट्रातील असून, त्यापैकी तब्बल ८ जिल्हे मराठवाड्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी ४८ टक्क्यांपर्यंत बालविवाह होत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.
मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता ही या समस्येची मुळ कारणे असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, ज्या महाराष्ट्राने मुलींच्या शिक्षणाची पहिल...
