नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश ठरतोय महाराष्ट्राचा अभिमान
डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना ‘मथुरा लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. हा सन्मान ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या 23 व्या वार्षिक अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. नांदे...
