Tag: भोकर–हिमायतनगर

तळपत्या उन्हात ‘सुवर्णवर्षाव’ !  भोकर-हिमायतनगर महामार्गालगत बहाव्याचा मनमोहक बहर

तळपत्या उन्हात ‘सुवर्णवर्षाव’ ! भोकर-हिमायतनगर महामार्गालगत बहाव्याचा मनमोहक बहर

महाराष्ट्र
निसर्गाची पावसाळ्याला हाक हिमायतनगर/भोकर/नांदेड, अनिल मादसवार| वैशाखाच्या तळपत्या उन्हात जिथे माणूस सावलीच्या शोधात भटकतो, तिथे भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गालगत राजवाडी ते सोमठाणा - टाकराळा शिवारातील जंगलकाठ मात्र सध्या ‘सुवर्णवर्षावाने’ उजळून निघाला आहे. बहाव्याच्या झाडांनी फुलांचा सोनेरी साज चढवत संपूर्ण परिसराला मोहक रुप दिले आहे. रखरखत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्याधमक फुलांनी लगडलेली झाडे पाहताना जणू निसर्गाने सूर्यकिरणांचाच वर्षाव जमिनीवर उतरवला आहे, असे दृश्य अनुभवायला मिळत आहे. पानगळ झालेल्या फांद्यांवर फुललेला हा बहावा प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून अनेकजण या निसर्गसोहळ्याला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात बहाव्याचा बहर म्हणजे पावसाळ्याची चाहूल मानली जाते. एप्रिल-मे महिन्यात फुलणारा हा वृक्ष काही दिवस परिसराला आगळेवेगळे सौंदर्य बहाल करतो. बहाव्या...
भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याविरोधात नागरिकांचा संताप

भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याविरोधात नागरिकांचा संताप

राजकारण
सुविधा नसताना वसुलीचा आरोप भोकर/हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 अ वरील भोकर–हिमायतनगर मार्गाची दुरुस्ती न करता तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड न करताच सोनारी फाटा येथे टोल नाका सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था दयनीय असूनही टोल आकारला जात आहे. काही ठिकाणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून फोनपेच्या माध्यमातून पैसे मागितले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ‘चेकिंग’च्या नावाखाली त्रास दिला जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ता दुरुस्त होईपर्यंत आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत टोल वसुली ...
error: Content is protected !!