भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई : 10 घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा; 78.35 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत 10 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून सोन्या-चांदीसह एकूण 78 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात भा.न्या.संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेजने तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संतोष तांबे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बाजी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सोशल मीडियावर फरांदे नगर परिसरातील चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण (CDR, डम्प डेटा) यांच्या मदतीने आरोपींचा ...
