Tag: भगवान परशुराम जन्मोत्सव

हदगाव शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष; भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

हदगाव शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष; भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरात अक्षय तृतीया निमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्राह्मण समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १९ एप्रिल रोजी घरोघरी प्रतिमा पूजन करण्यात आले, तर २० एप्रिल रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय परशुराम’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. शोभायात्रेची सुरुवात शहरातील मानाचे श्री सत्य गणपती मंदिर येथून करण्यात आली. पारंपरिक गणपती मार्गानुसार ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरली. शेवटी भगवान परशुराम यांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक डॉ. परसरामजी तिवारी यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. या सोहळ्यासाठी हदगाव शहरासह तामसा, मनाठा, भानेगाव, शिरड आदी गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, पुरुष आणि लहान मुलांचा उत्साह विशेष उल्...
error: Content is protected !!