Tag: बहादरपुराच्या पेठकर

बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे देशभर कौतुक; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून विशेष उल्लेख

बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे देशभर कौतुक; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून विशेष उल्लेख

महाराष्ट्र
लग्नातील 'रिटर्न गिफ्ट' म्हणून ३,५०० गावकऱ्यांना एक लाखांचा अपघाती विमा; नांदेडच्या सामाजिक उपक्रमाची देशभर चर्चा नांदेड | कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबाच्या समाजोपयोगी उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. विवाहसोहळ्यात पाहुण्यांना पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी गावातील सुमारे साडेतीन हजार नागरिकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा भेट देण्याचा अभिनव निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमातून पेठकर कुटुंबाचे कौतुक केले. सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बहादरपुरा गावाची ओळख देशभर पोहोचली आहे. आपल्या मनोगतात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात लग्न किंवा कौटुंबिक समारंभ हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाचा उत्सव असतो. अशा आनंदाच्या क्षणी कठीण काळात उपयोगी पडणारी भेट देण्...
error: Content is protected !!