प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यात खत वितरणावरून शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोनच पोती खत द्यावे” असा आदेश खत विक्रेत्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ एकर शेती असो किंवा १० ते २० एकर शेती असलेला शेतकरी असो, सर्वांना समान प्रमाणात केवळ दोनच पोती खत देणे अन्यायकारक आहे. “जमीन जास्त, पीक जास्त आणि गरज जास्त असताना खत मात्र समान कसे?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार खत वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यात खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी Farmer ID आणि नियंत्रण प्रणाली लागू करण्याबाबत हालचाली...
