श्री गणेश महापुराण कथेत पोलीस निरीक्षक केंद्रे सहपरिवार सहभागी
गणेश लीला, झांकी व भक्तिमय वातावरणाने हिमायतनगरकर भारावले काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने समारोप
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय श्री गणेश महापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरही या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेत कथाश्रवणाचा लाभ घेतला.
यावेळी श्री परमेश्वर मंदिर संस्थान कमेटीच्या वतीने पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा श्रींची प्रतिमा भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर यांच्या ओजस्वी वाणीतून सुरू असलेल्या श्री गणेश महापुराण कथेदरम्यान गणपती बाप्पांच्या विविध लीला आणि प्रसंग आकर्षक ...
