हिमायतनगर तालुक्यात वादळ-वाऱ्यासह पावसाचा तडाखा; पिके व घरांचे मोठे नुकसान
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात रविवारी रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे व पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांतील घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
विशेषतः हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (पश्चिम) परिसरात वादळाचा फटका अधिक बसला. गावातील अनेक कुटुंबांचे निवारे उद्ध्वस्त झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. यात हळद, उन्हाळी ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा,चिकू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुक्या जनवारांसाठी जमून ठेवलेल वैरण देखील वादळी वाऱ्याने उडून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांवरील टिन पत्रे उडून गेल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहेत. काही ठिका...
