पहिल्याच प्रयत्नात गुणवंत पावडे यांची सीए परीक्षेत घवघवीत भरारी
नांदेडच्या गुणवंताने मिळवले सनदी लेखापाल (CA) पद; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
नांदेड | नांदेड शहरातील प्रतिष्ठित उद्योजक तथा वामनराव पावडे मंगल कार्यालय आणि गंगोत्री स्वीट हॉलचे संचालक बालासाहेब किशनराव पावडे (दीपनगर) यांचे सुपुत्र गुणवंत बालासाहेब पावडे यांनी पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल (Chartered Accountant - CA) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत गुणवंत यांनी हे यश मिळवून आपल्या कुटुंबासह नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.
या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, गुरुजन आणि बहीण डॉ. गायत्री पावडे यांना दिले. गुणवंत यांनी आपले शालेय शिक्षण गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पूर्ण केले असून, त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर...
