Tag: पत्रकार संरक्षण कायदा लागू न करण्यामागे

पत्रकार संरक्षण कायदा लागू न करण्यामागे सरकारची भीती काय? एस. एम. देशमुख यांचा सरकारला थेट सवाल

पत्रकार संरक्षण कायदा लागू न करण्यामागे सरकारची भीती काय? एस. एम. देशमुख यांचा सरकारला थेट सवाल

महाराष्ट्र
मुंबई | महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ले, जीवे मारण्याच्या धमक्या आणि अर्वाच्च शिवीगाळीच्या घटना सातत्याने वाढत असताना, सरकारने मंजूर झालेला पत्रकार संरक्षण कायदा अद्याप लागू का केला नाही, असा रोखठोक सवाल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले. त्यानंतर २०१८ मध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळून त्याचे कायद्यात रूपांतर झाले आणि भारत सरकारच्या राजपत्रातही तो प्रसिद्ध झाला. मात्र, राज्य सरकारने अद्याप अधिसूचना (Notification) जारी न केल्याने हा कायदा प्रत्यक्षात लागू झालेला नाही. त्यांच्या मते, कायदा लागू झाल्यास पत्रकारांवर हल्ला करणे, धमक्या देणे किंवा त्यांच्या ...
error: Content is protected !!