Tag: नांदेड पोलीस

श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

क्राइम
नांदेड | नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या सहा तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. यावेळी मुख्य आरोपीवर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करत त्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे 5.20 वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर यांचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तात्काळ चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. मुख्य आरोपीवर गोळीबार मुख्य आरोपी अंकुश गजानन गंदनवाड (वय 20) हा झरी खदान परिसरात...
अवैध सावकारी प्रकरणात ५ आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

अवैध सावकारी प्रकरणात ५ आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

क्राइम
नांदेड| अवैध सावकारी व्यवसाय करून पैसे वसुलीसाठी नागरिकांना डांबून ठेवत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाणे भाग्यनगर (गु.र.नं. 165/2026) व अर्धापूर (गु.र.नं. 171/2026) येथे भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी रात्रगस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार साठे चौक परिसरातील खालसा फायनान्स व गुरुकृपा ट्रेडर्स कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्य...
वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून १७ चोरीच्या दुचाकी जप्त

वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून १७ चोरीच्या दुचाकी जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत तब्बल १७ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ₹३.९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर कैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कशी उघडकीस आली चोरीची मालिका? फिर्यादी मोहम्मद जुनेद कुरेशी (रा. देगलूर नाका, नांदेड) यांची मोटारसायकल १६ मार्च रोजी चिखलवाडी परिसरातून चोरीला गेल्याची तक्रार वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली. हिंगोली गेट परिसरात दोन संशयित मुलं चोरीच्या मोटारसायकलसह थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळ...
नांदेड जिल्ह्यात पोलिसांची धडक ‘मास रेड’

नांदेड जिल्ह्यात पोलिसांची धडक ‘मास रेड’

क्राइम
नांदेड| नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘मास रेड’ मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध दारू निर्मिती व विक्री, तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकून एकूण 1 लाख 5 हजार 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मार्च रोजी जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई केली. या ‘मास रेड’ दरम्यान अवैध दारू निर्मिती व विक्री करणारे तसेच जुगार खेळणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. कारवाईत एकूण 54 गुन्हे नोंदवून 54 आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विविध ठिकाणांहून रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 1,05,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याच...
error: Content is protected !!