नांदेड जिल्ह्यात पोलिसांची धडक ‘मास रेड’

नांदेड| नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘मास रेड’ मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध दारू निर्मिती व विक्री, तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकून एकूण 1 लाख 5 हजार 835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मार्च रोजी जिल्हाभरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी समन्वयाने ही कारवाई केली.

या ‘मास रेड’ दरम्यान अवैध दारू निर्मिती व विक्री करणारे तसेच जुगार खेळणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. कारवाईत एकूण 54 गुन्हे नोंदवून 54 आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विविध ठिकाणांहून रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 1,05,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने पोलिसांची ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!