उन्हाचा तडाखा वाढला; नांदेड जिल्ह्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात
पावसाअभावी वाढलेल्या उष्णतेमुळे प्रशासनाचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
22 जूनपासून शाळांच्या वेळेत बदल, सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंत वर्ग
इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या सर्व शाळांना आदेश लागू
राज्य मंडळ, सीबीएसई व इतर सर्व बोर्डांचा समावेश
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
नांदेड | जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
नवीन आदेशानुसार, 22 जून 2026 (सोमवार) पासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 8 ते दु...
