Tag: नगरपंचायत

नगरपंचायतीकडे नागरिकांच्या हक्कासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन; मालमत्ता नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

नगरपंचायतीकडे नागरिकांच्या हक्कासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे निवेदन; मालमत्ता नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

राजकारण
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 10 मधील नागरिकांच्या मालमत्ता नोंदणीच्या प्रश्नावर भाजपचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी नगरपंचायतीकडे निवेदन देत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या निवेदनामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल असा ठाम विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला आहे आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाका गल्ली व बजरंग चौक परिसरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित जागेवर वास्तव्यास असूनही त्यांच्या मालमत्तेची नोंद नगरपंचायतीच्या अभिलेखात नमुना 43 मध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांनी सादर केलेल्या निवेदनात पुढ...
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्या; हिमायतनगरात पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा द्या; हिमायतनगरात पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे. युवा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव किशन शिंदे यांनी यासंदर्भात निवेदन देत ३१ मार्च २०२६ पासून हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही दोन वेळा याच मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. “जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम इ...
error: Content is protected !!