Tag: तीव्र आंदोलन

टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

करियर
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नांदेड | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका एक दिवस आधीच फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डिवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा निषेध क...
भोंदूगिरी प्रकरणावर माकप आक्रमक; ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी, नांदेडमध्ये तीव्र आंदोलन

भोंदूगिरी प्रकरणावर माकप आक्रमक; ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी, नांदेडमध्ये तीव्र आंदोलन

महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील काही आमदार, मंत्री व अधिकाऱ्यांनी भोंदूगिरीला शरण जाऊन तंत्र-मंत्राच्या नावाखालील प्रकारांना पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप करत, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ३९ आमदारांची यादी जाहीर करून त्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत, तसेच अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. माकपने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे निवेदन सादर केले. माकपच्या नेत्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींवर संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. मात्र, काही जण अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याने समाजात चुकीचे संदेश जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक ...
error: Content is protected !!