Tag: डॉ. हंसराज वैद्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात क्रांतिकारक निर्णय घ्या – डॉ. हंसराज वैद्य यांची मागणी

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात क्रांतिकारक निर्णय घ्या – डॉ. हंसराज वैद्य यांची मागणी

महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घ्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक फेडरेशन (फेस्कॉम) चे उत्तर मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ही मागणी व्यक्त केली. डॉ. वैद्य म्हणाले की, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा, दिल्ली व झारखंड या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस व कल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. मग सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्रात असे निर्णय का घेतले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित पुरोगामी राज्य आहे. मात्र प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या त...
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या; डॉ. हंसराज वैद्य यांचा इशारा

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या; डॉ. हंसराज वैद्य यांचा इशारा

महाराष्ट्र
नांदेड | ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने तातडीने ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघ फेडरेशनचे उत्तर मराठवाडा प्रादेशिक अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य (Dr Hansraj Vaidya) यांनी केली आहे. “अजूनही संधी गेलेली नाही; मात्र विलंब केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला. विधानसभेत २०२५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा-सुविधांबाबत महत्त्वपूर्ण विधेयक मांडण्यात आले होते. त्यानुसार दरमहा ₹७००० आर्थिक सहाय्य, महाराष्ट्र दर्शनासाठी वार्षिक ₹१५,०००, आरोग्य सेवेसाठी ₹५ लाखांपर्यंत मदत, निवास व भोजनाची सोय आणि टोल-फ्री हेल्पलाईन यांसारख्या सुविधा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, या योजना अद्याप प्रत्यक्षात उतरल्या नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रश्नावर आमदार आनंदराव तिडके पाटील बोंढारकर आणि आमदार राजू...
error: Content is protected !!