Tag: टोल मात्र कायम!

खड्ड्यांतून प्रवास, टोल मात्र कायम! महामार्गावर झाडे नसल्याने नागरिक संतप्त

महाराष्ट्र
हिमायतनगर/भोकर (प्रतिनिधी) एकीकडे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि दुसरीकडे सुरूच असलेली टोल वसुली… यामुळे वाहनधारकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. सरसम म्हसोबा नाण्यापासून पुढे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खोल खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. वाहनधारकांच्या मते, रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू ठेवणे हा सरळसरळ अन्याय आहे. “सुविधा शून्य, शुल्क पूर्ण” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. दरम्यान, भोकर–हिमायतनगर (१६१ ए) राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली; मात्र त्यानंतरची वृक्षलागवड आणि संगोपन पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. परिणामी...
error: Content is protected !!