Tag: जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत विकासकामांचा आढावा; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जिल्हा परिषदेत विकासकामांचा आढावा; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

राजकारण
नांदेड| माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत विविध विकासकामांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन, वॉटर ग्रीड योजना, रस्ते विकास, पाणंद रस्ते, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच रोजगार हमी योजनेतील कामांवर विशेष चर्चा करण्यात आली. खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रगती आणि त्यामधील अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस अर्धापूर भाजपा तालुकाध्य...
जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

सामाजिक
नांदेड | जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्तावना शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केली. यावेळी शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष विठ्ठल ताकबीडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस संजय कोठाळे ...
error: Content is protected !!