Tag: जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

शेती
३७.५० लाख वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नांदेड | पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हरित नांदेडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मृद व जलसंधारण विभागाच्या १ लाख बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ आज मौजे सालेगाव (ता. धर्माबाद) येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला. यंदाच्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ३७ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाला १ लाख बांबू लागवडीचे विशेष उद्दिष्ट देण्यात आले आहे. पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण व इतर जलसंधारण कामांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार श्रीमती स्वामी, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे, उपवि...
गॅस पुरवठ्यावर प्रशासनाची कडक नजर

गॅस पुरवठ्यावर प्रशासनाची कडक नजर

सामाजिक
नांदेड, अनिल मादसवार | जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून सर्व गॅस वितरकांना ‘घरपोच सेवा अनिवार्य’ करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि एजन्सी धारक उपस्थित होते. वाढती गर्दी, तक्रारी आणि ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने ही ठोस पावले उचलली आहेत. एजन्सीवरून थेट वितरणास बंदी ग्राहकांना एजन्सीवर बोलावून सिलिंडर देण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच गॅस सिलिंडर पोहोचवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी नियोजन एज...
error: Content is protected !!