खडकपुरा भागात अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल:
नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मागील काही दिवसांपासुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत होती. परंतु काल दि.०४.०५.२०२६ रोजी खडकपुरा वाघी रोड येथे जमावाने अतिक्रमणची कारवाई चालु असताना महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर पालिका प्रशासनाने वजिराबाद पोलीस स्टेशन येथे तातडीने गुन्हा दाखल करून पुन्हा त्याच ठिकाणी फौजफाट्यासह धडक कारवाई करत वाघी रोडवर महापालिकेने २ जेसीबीच्या सहाय्याने एकुण ५० ते ६० अतिक्रमण धारकावर धडक कारवाई करत अतिक्रणाचा सफाया केला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली जात आहे. सोमवार दि.०४.०५.२०२६ रोजी अतिक्रमण विभागाचे पथक कलामंदिर ते मिल रोड व त्यानंतर ख...


