Tag: गुटखा

गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रविरोधी मोहिमेत 131 गुन्हे दाखल

गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रविरोधी मोहिमेत 131 गुन्हे दाखल

क्राइम
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोठी कारवाई; 94 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड | सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठा प्रहार करत गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 131 गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 94 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत ही धडक मोहीम राबवण्यात आली. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांनी संयुक्तरीत्या या कारवायांमध्ये सहभाग घेतला. यात गुटखा प्रकरणे : 34 गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे : 5 गुन्हे, शस्त्र कायदा प्रकरणे : 92 गुन्हे असे एकूण गुन्हे : 131 दाखल करण्यात आले असून, यात गुटखा व इतर साहित्य : ₹57,48,753, गांजा व वाहन : ₹15,87,450, घातक शस्त्रे (पिस्टल...
नांदेड परिक्षेत्रात मोठी मोहीम; गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांवर पोलिसांचा कडक प्रहार

नांदेड परिक्षेत्रात मोठी मोहीम; गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांवर पोलिसांचा कडक प्रहार

क्राइम
नांदेड परिक्षेत्रात धडक मोहीम; आठवड्यात ७३ गुन्हे, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त  नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पहिल्याच आठवड्यात मोठे यश मिळाले आहे. दि. ११ ते १७ एप्रिल दरम्यान झालेल्या कारवाईत एकूण ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ₹५०.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. यामध्ये गुटखा प्रकरणे: १२ गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे: १ गुन्हा, शस्त्र अधिनियमांतर्गत: ६० गुन्हे दाखल झाले असून, ₹30,60,611 किमतीचा गुटखा व अन्य साहित्य ₹1,12,550 किमतीचा गांजा ₹18,79,230 किमतीची शस्त्रे (३ गावठी पिस्टल, १० काडतुसे, तलवारी, खंजीर) अशी एकू...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांविरोधात विशेष मोहीम; पहिल्याच दिवशी मोठी कारवाई

नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांविरोधात विशेष मोहीम; पहिल्याच दिवशी मोठी कारवाई

क्राइम, स्थानिक
नांदेड | आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिलदरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. गुटखा विक्रीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123 अंतर्गत 2 गुन्हे दाखल करून 1 लाख 17 हजार 642 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. घातक शस्त्रांविरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईत शस्त्र अधिनियमांतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींकडून 57 हजार 822 रुपयांच्या तलवारी व खंजर जप्त करण्यात आले असून, एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.  ‘खबर’ हेल्पलाइनद्वारे माहिती द्या अवैध व्यवस...
पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

क्राइम, महाराष्ट्र
नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहि...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाई : नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांच...
कुंडलवाडी पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-पान मसाला जप्त

कुंडलवाडी पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-पान मसाला जप्त

क्राइम
नांदेड/बिलोली | कुंडलवाडी पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत 1 लाख 8 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कुंडलवाडी शहरातील नवा गल्ली परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या घरातून विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला. या कारवाईत M Scented Tobacco Gold, SR सुगंधित पान मसाला, Royal Zafrani Zarda, Bombay Royal पान मसाला अशा विविध ब्रँडचा साठा तसेच MH 26 S 5207 क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण 1,08,690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 39/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 123, 275, 223 तसेच अन्न स...
नांदेड परिसरात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिसरात गुटखा विरोधी मोहिमेला वेग; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दि. 16 ते 31 मार्चदरम्यान पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने 30 मार्च रोजी उदगीर–अहमदपूर रोडवर संशयित बोलेरो वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैध गुटखा साठा आढळून आला. या कारवाईत सुमारे 8 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई सुरू आहे. गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यांसारख...
error: Content is protected !!