Tag: खुरगाव

खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकरांची सदिच्छा भेट

खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकरांची सदिच्छा भेट

सामाजिक
बोधीवृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; श्रामणेर प्रशिक्षण केंद्र देशपातळीवर विकसित करण्याचा विश्वास नांदेड,प्रतिनिधी| खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी भदन्त पय्याबोधी थेरी यांच्या उपस्थितीत सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. बोधीवृक्षाच्या रोपणातून पर्यावरण संवर्धनासोबतच धम्म आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते जपण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी सुजात आंबेडकर यांनी विहाराची तसेच श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसराची पाहणी केली. उपासक-उपासिकांसाठी विहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भदन्त पय्याबोधी थेरी यांचे अभिनंदन केले. विहाराच्या उद्घाटनापूर्वीच शुभेच्छा देताना, या पवित्र स्थळी उभारण्यात येत असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठर...
खुरगाव येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

खुरगाव येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

धर्म अध्यात्म
नांदेड | तालुक्यातील खुरगाव (नांदुसा परिसर) येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात रविवार, १९ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार असून निर्वाणपदस्थ भदंत जीनरत्न महाथेरो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले की, या प्रसंगी विपश्यनाचार्य भदंत पंय्यारत्न थेरो यांची धम्मदेसना होणार आहे. तसेच थायलंड धम्म सहलीवरून परतलेल्या बौद्ध उपासक-उपासिकांचा भव्य सत्कारही करण्यात येणार आहे. कार्यक्रमात परित्राण पाठ, बोधीपूजा, त्रिरत्न वंदना, आनापान ध्यान, धम्मदेसना, बुद्ध-भीम गीतांचा कार...
error: Content is protected !!