फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. आयडीशिवाय खत वितरण केले जाणार नाही. रासायनिक खतांवरील शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. खतांचा काळाबाजार, साठेबाजी व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असून वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.
डिजिटल नोंदणी प्रणाली - या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन, पीक व योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी क्रमांक किंव...
