Tag: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर; बिलोली शहराच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर; बिलोली शहराच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

महाराष्ट्र
बिलोली,गोविंद मुंडकर| बिलोली शहराच्या भविष्यातील विकासाला गती मिळावी, वाहतुकीची समस्या कमी व्हावी आणि व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी या उद्देशाने बिलोलीतील सामाजिक व राजकीय स्तरावरून पुन्हा एकदा महामार्ग आणि चेकपोस्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामुळे या विषयाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे. माजी नगराध्यक्ष विजयकुमार वेंकटेश कुंचनवार आणि नांदेड जिल्हा उद्योग आघाडी (ग्रामीण भाजप) चे उपाध्यक्ष भागवत मनोहरराव लोकमनवार यांनी संयुक्तपणे हे निवेदन सादर केले असून, त्यामध्ये दोन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. शिरूर ताजबंद – केंद्रकुर्ती महामार्ग बिलोलीमार्गे न्यावा - निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेला एनएच-१६१बीबी हा शिरूर ताजबंद ते केंद्रकुर्ती म...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बालाजी बच्चेवार यांनी घेतली सदिच्छा भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बालाजी बच्चेवार यांनी घेतली सदिच्छा भेट

राजकारण
नांदेड (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते बालाजी बच्चेवार यांनी आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नायगाव विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे, पायाभूत सुविधा तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणींच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विचारविनिमय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी प्रवीण काचावार व सागर बंडेवार हे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे नायगाव मतदारसंघातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे....
error: Content is protected !!