Tag: कारवाई

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

क्राइम
११ जणांविरुद्ध गुन्हा, २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान जुगार अड्ड्यावर छापा टाकत ११ जणांविरुद्ध कारवाई केली असून, एकूण २ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १४ एप्रिल रोजी पहाटे माळटेकडी रोड परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 399/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. छाप्यादरम्यान काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले, तर काहींना ताब्यात घेण्यात आले. शेख अहमद शेख मिहीख, मोहम्मद नावीद मोहम्मद रफिक, सय्यद अथर, सय्यद अर्शद, फिरोज खान, अजहर खान व इतर (सर्व रा. नांदेड)   रोख रक्कम व जुगार साहित्य (पत्...
अनियमितता, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे: खा. अशोकराव चव्हाण

अनियमितता, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे: खा. अशोकराव चव्हाण

राजकारण
नांदेड|महाराष्ट्र विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या नांदेड जिल्हा पाहणी दौऱ्यात जिथे अनियमितता किंवा भ्रष्टाचार आढळला असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. अंदाज समितीच्या दौऱ्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. यावर खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, समितीने त्यांचा अहवाल नियमानुसार विधीमंडळाला सादर करून अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करावी, कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला किंवा गैरव्यवहाराला पाठीशी घालता कामा नये, हीच माझी भूमिका आहे. उलटपक्षी अंदाज समितीला आढळलेल्या गैरव्यवहारांची माहिती सार्वजनिक करणे शक्य असेल तर आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर चौकशीसाठी पाठपुरावा करू. अंदाज समितीला आढळलेल्या प्रत्येक गैरव्यवहाराची सत्यता समोर आली पाह...
देगलूर पोलिसांची सट्टा जुगारावर धडक; ४ आरोपींवर कारवाई, लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

देगलूर पोलिसांची सट्टा जुगारावर धडक; ४ आरोपींवर कारवाई, लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड/देगलूर (प्रतिनिधी) अवैधरित्या ऑनलाईन सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर देगलूर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, देगलूर शहराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत काही जण ऑनलाईन क्रिकेट सट्टा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक मारोती श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ५ एप्रिल रोजी सायंकाळी छापा टाकला. छाप्यात आरोपी मोबाईलद्वारे ऑनलाईन आयडीवर पैसे लावून सट्टा खेळत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल (किंमत सुमारे ३१ हजार रुपये), एक स्कूटी (१० हजार रुपये) तसेच ४,४८० रुपये रोख रक्कम असा एकूण १,०५,४...
चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| अवैध चंदन तस्करीविरोधात नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लातूरहून मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरकडे आयशर वाहनातून चंदनाची तस्करी होणार होती. त्यानुसार, लोहा-नांदेड मार्गावरील सई हॉटेलजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे दिसून आले, मात्र तपासात ड्रायव्हरच्या मागील बाजूस बनवलेल्या गुप्त कप्प्यात चंदन लपवून ठेवले असल्याचे उघड झाले. या कप्प्यातून 1,470 किलो वजनाचे सुमारे 36.75 लाख रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले. तसेच आयशर वाहन आणि 11 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 51.96 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी तुकाराम बुंदराळे, तौफिक देशमुख, रामदास बुंदराळे, बाळासाहेब जाधव आणि शंकर मानपा...
RPF-जीआरपीची संयुक्त कारवाई

RPF-जीआरपीची संयुक्त कारवाई

क्राइम
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत प्रवासी व रेल्वे सुरक्षेसंदर्भात मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने रेल्वे यार्डमधून सुमारे ३० मीटर कॅटेनरी वायर (तांबे) आणि ७.५ मीटर डिस्चार्ज केबल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध RP(UP) कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये घडलेल्या उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणात RPF आणि GRP च्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका महिला प्रवाशाची सुमारे ७.२० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीचे दागिने व हिरे असलेली पर्स ट्रेनमध्ये हिसकावून नेण्यात आली होती. या प्रकरणात आर...
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध शस्त्र जप्त, १७ आरोपी जेरबंद

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध शस्त्र जप्त, १७ आरोपी जेरबंद

क्राइम
नांदेड | नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्यावर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईत ७ अवैध अग्निशस्त्रांसह ७६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून तब्बल १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही विशेष मोहीम १ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विविध ठिकाणी सापळे रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या मोहिमेत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ७ अग्निशस्त्र, ७६ काडतुसे आणि ३ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. अवैध शस्त्र बाळगणे हे केवळ गंभीर गुन्हा नसून समाजासाठी मोठा धोका ठरत असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासना...
error: Content is protected !!