Tag: कडक निर्बंध

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; 100 मीटर परिसरात कडक निर्बंध

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; 100 मीटर परिसरात कडक निर्बंध

करियर
नांदेड| राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षा-२०२६ पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील परीक्षा केंद्र परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षेचे वातावरण शांत, सुरक्षित आणि पारदर्शक राहावे यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. एमबीए/एमएमएस तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यास-क्रमांसाठी एमएच-सीईटी परीक्षा नांदेड शहरात दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली आहे. पहिला टप्पा ६ ते २६ एप्रिल २०२६, तर दुसरा टप्पा ९ ते १९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत पार पडणार आहे. तीन परीक्षा केंद्रांवर निर्बंध - नांदेडमधील तीन परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात हे आदेश लागू असतील , ज्ञानदीप...
error: Content is protected !!