Tag: कचरा

अबुबकर देवस्थान परिसरात कचरा टाकण्यावर नागरिकांचा आक्रोश; तात्काळ कारवाईची मागणी

अबुबकर देवस्थान परिसरात कचरा टाकण्यावर नागरिकांचा आक्रोश; तात्काळ कारवाईची मागणी

सामाजिक
हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरातील टेंभी रोड परिसरातील अबुबकर देवस्थानाच्या जागेत नगरपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर पंचायत हिमायतनगर यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील कचरा ट्रॅक्टरद्वारे टेंभी रोडवरील माळरान भागात, अबुबकर देवस्थानाच्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचून दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना नाकाला रुमाल बांधावा लागत असून, जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे धूर व धूळ निर्माण होत आहे. या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, येत्या १० एप्रिल रोजी अबुबकर य...
error: Content is protected !!