Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeसामाजिकअबुबकर देवस्थान परिसरात कचरा टाकण्यावर नागरिकांचा आक्रोश; तात्काळ कारवाईची मागणी

अबुबकर देवस्थान परिसरात कचरा टाकण्यावर नागरिकांचा आक्रोश; तात्काळ कारवाईची मागणी

हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरातील टेंभी रोड परिसरातील अबुबकर देवस्थानाच्या जागेत नगरपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर पंचायत हिमायतनगर यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Oplus_16908288

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील कचरा ट्रॅक्टरद्वारे टेंभी रोडवरील माळरान भागात, अबुबकर देवस्थानाच्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचून दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना नाकाला रुमाल बांधावा लागत असून, जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे धूर व धूळ निर्माण होत आहे. या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

Oplus_16908288

विशेष म्हणजे, येत्या १० एप्रिल रोजी अबुबकर या ठिकाणी संदल कार्यक्रम आयोजित आहे. तसेच या परिसराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून, येथे माहूरकडे जाणारा पुरातन भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. परिसरात मसाई देवीचेही स्थान असून, हिंदू-मुस्लिम समाजाचे हे एकत्रित श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी कचरा टाकल्याने भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Oplus_16908288

त्यामुळे नगरपंचायतीने तात्काळ या ठिकाणी टाकलेला कचरा हटवून पुढे येथे कचरा टाकू नये, तसेच पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संजू बासेवाड, दत्ता बासेवाड, दत्ता तुंगेवाड, रामजी डवरे, दत्ता अशोक बासेवाड, परमेश्वर आडेलू, पिराजी आडेलू, अशोक आडेलू, विठ्ठल तुंगेवाड, श्रीकांत दिगंबर तुंगेवाड यांच्यासह अनेक शेतकरी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!