कंधार पंचायत समितीत संघर्षाची ठिणगी’; ग्रामसेवक संघटनेचा एल्गार, बैठकीवर बहिष्कार
'बदली झाल्याशिवाय माघार नाही'; विस्तार अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका, सहा मागण्यांचे निवेदन
कंधार, सचिन मोरे| कंधार पंचायत समितीतील प्रशासकीय वातावरण बुधवारी चांगलेच तापले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, तालुका शाखा कंधारने पंचायत समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकत प्रशासनाविरोधात उघड एल्गार पुकारला. विस्तार अधिकारी के.व्ही. रेणेवाड यांची तालुक्याबाहेर बदली, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील कथित मानसिक व आर्थिक पिळवणूक थांबविणे, घरकुल योजनांतील कथित गैरप्रकारांची चौकशी यासह सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
संघटनेने स्पष्ट केले की, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध अडचणी आणि तक्रारी वारंवार मांडूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अधिकाऱ्यांशी अपमानास्पद वागणूक, कथित आर्थिक देवाणघेवाण आणि कामकाजातील अडथळ्यांमुळे अधिकारी वर्गात तीव्र असंतोष निर्म...




