Tag: “ऑपरेशन क्रॅकडाउन”

“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत भाग्यनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; 4.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत भाग्यनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; 4.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत “ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 02 मे 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे अरुणोदय नगर परिसरात “आंदर-बाहर” जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन तसेच दुचाकी वाहने असा एकूण ₹4,52,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक 239/2026 नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. ही कारवाई अविनाश कुमार (पोलीस अध...
“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत इस्लापूर परिसरात पोलिसांची मोठी संयुक्त कारवाई

“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत इस्लापूर परिसरात पोलिसांची मोठी संयुक्त कारवाई

क्राइम
नांदेड| जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाउन” मोहिमेत इस्लापूर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस स्टेशन इस्लापूर हद्दीतील मौजे शिवनी व आजूबाजूच्या दुर्गम भागात पहाटे 4 वाजल्यापासून नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. हातभट्टी दारू निर्मितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अत्यंत गोपनीय आणि काटेकोर नियोजनातून ही मोहीम पार पडली. या संयुक्त कारवाईत 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 पोलीस अंमलदार तसेच 2 RCP प्लाटूनचा सहभाग होता.  हातभट्टी दारू संदर्भात 22 गुन्हे दाखल, मोहमास सडवा : 17,250 लिटर (₹8,62,500 अंदाजे), हातभट्टी दारू : 166 लिटर (₹16,000 अंदाजे), मोहफुले : 1,500 किलो (₹45,000 अंदाजे),  रसायनमिश्रित सिंधी : 2 गुन्हे, 2,700 लिटर (₹54,000 अंदाजे),  गुटखा प्रकरण : 1 कारवाई (₹48,84...
error: Content is protected !!