“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत इस्लापूर परिसरात पोलिसांची मोठी संयुक्त कारवाई

नांदेड| जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाउन” मोहिमेत इस्लापूर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस स्टेशन इस्लापूर हद्दीतील मौजे शिवनी व आजूबाजूच्या दुर्गम भागात पहाटे 4 वाजल्यापासून नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.

हातभट्टी दारू निर्मितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अत्यंत गोपनीय आणि काटेकोर नियोजनातून ही मोहीम पार पडली. या संयुक्त कारवाईत 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 पोलीस अंमलदार तसेच 2 RCP प्लाटूनचा सहभाग होता.

 हातभट्टी दारू संदर्भात 22 गुन्हे दाखल, मोहमास सडवा : 17,250 लिटर (₹8,62,500 अंदाजे), हातभट्टी दारू : 166 लिटर (₹16,000 अंदाजे), मोहफुले : 1,500 किलो (₹45,000 अंदाजे),  रसायनमिश्रित सिंधी : 2 गुन्हे, 2,700 लिटर (₹54,000 अंदाजे),  गुटखा प्रकरण : 1 कारवाई (₹48,840 अंदाजे) एकूण सुमारे ₹10.26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांवरही कारवाई सुरू आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपी निष्पन्न झाले आहेत. या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिक आणि महिला भगिनींनी पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले असून त्याबद्दल प्रशासनाने आभार व्यक्त केले आहेत.

नांदेड जिल्हा पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू, अंमली पदार्थ, शस्त्रे, जुगार आदी बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा 112 हेल्पलाइन वर द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!