उन्हाळी सुट्ट्यांत प्रवाशांसाठी दिलासा; CSMT–हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू
मुंबई/नांदेड (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगर – जालना – परभणी – पूर्णा – नांदेड मार्गे धावणार असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्र. 01011 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 23 एप्रिल ते 9 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 00.20 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 7.50 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल.
परतीच्या दिशेने गाडी क्र. 01012 ही विशेष रेल्वे त्याच कालावधीत प्रत्येक गुरुवारी हैदराबाद येथून रात्री 10.00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सायंकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
ही गाडी दादर, ठाणे,...
