उदगीरमध्ये 18-19 एप्रिलला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन
देशभरातून 2500 पत्रकारांची उपस्थिती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
उदगीर| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18 व 19 एप्रिल 2026 रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून सुमारे 2500 पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, राजेंद्र दर्डा उद्घाटन करतील. बाबासाहेब पाटील हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले तर सह-स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय बनसोडे कार्य पाहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एम. देशमुख तर अधिवेशनाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर असतील.
18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. यापूर्वी शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार असून त्यात शाले...

