Tag: उत्साहात संपन्न

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात संपन्न; रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद

हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात संपन्न; रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद

महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर | भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार देशभरात 'हर घर तिरंगा २०२६' अभियान अत्यंत उत्साहात सुरू आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून दि.१३.०८.२०२६ रोजी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक भव्य आणि अभूतपूर्व *'तिरंगा बाईक रॅली'* काढण्यात आली. शेकडो दुचाकीस्वार, हातात डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणा अशा अत्यंत भारावून टाकणाऱ्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली. या रॅलीने आज संपूर्ण नांदेड शहराला देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकले. या अभूतपूर्व तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात नविन नांदेड भागातील हडको बस स्टॉप पासुन करण्यात आली. हडको चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केल्यानंतर तिरंगा कॅनव्हसवर स्वाक्षरी करुन *महापौर सौ...
गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डातर्फे 71 वा सामूहिक विवाह महोत्सव उत्साहात संपन्न

गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डातर्फे 71 वा सामूहिक विवाह महोत्सव उत्साहात संपन्न

सामाजिक
नांदेड| सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी जपत गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांच्या वतीने दिनांक 2 व 3 मे 2026 रोजी 71 वा सामूहिक विवाह महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे सकाळी 11.30 वाजता माननीय पंज प्यारे साहिबान तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे दरवर्षी मे आणि डिसेंबर महिन्यात सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत 70 विवाह मेळावे यशस्वीरित्या पार पडले असून सुमारे 2400 हून अधिक जोडप्यांचे विवाह बोर्डाच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. यंदाच्या मेळाव्यात देशातील विविध भागांतून आलेल्या 13 जोडप्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला. गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक स. विजय सतबीर सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह महोत्सव पार पडला. तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भा...
हिमायतनगरमध्ये 31 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा (इजतेमाई शादिया) उत्साहात संपन्न

हिमायतनगरमध्ये 31 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा (इजतेमाई शादिया) उत्साहात संपन्न

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर येथे समाजसेवक हाजी अब्दुल वहीद यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही (इजतेमाई शादिया) सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. रविवारी संपन्न झालेल्या या सोहळ्यात एकूण 31 जोडप्यांचा विवाह आनंदात पार पडला. नांदेडचे रहिवासी व हिमायतनगरचे जावई असलेले हाजी अब्दुल वहीद सेठ हे होंडा कंपनीचे डीलर असून सामाजिक कार्यातही ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या तहजीब फाउंडेशनच्या माध्यमातून २००७ पासून सामूहिक विवाह सोहळ्यांचा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नातून तब्बल ५४० जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडले आहेत. हिमायतनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात विवाह विधी मौलाना मुफ्ती उबेदुल्लाह यांनी संपन्न करून दिले, तर हाफेज अजीम साब यांनी वधू-वरांसाठी दुआ केली. या प्रसंगी वधू-वरांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच शेकडो ...
error: Content is protected !!