Tag: आ. बाबूराव कदम कोहळीकर

हदगावात रविवारी भव्य सामूहिक विवाह सोहळा; मोठ्या उपस्थितीचे आ. बाबूराव कदम कोहळीकर यांचे आवाहन

हदगावात रविवारी भव्य सामूहिक विवाह सोहळा; मोठ्या उपस्थितीचे आ. बाबूराव कदम कोहळीकर यांचे आवाहन

राजकारण
हदगाव,गौतम वाठोरे| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव येथे रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा भार कमी करणे आणि सामाजिक ऐक्य व साधेपणाचा आदर्श निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिवसेना (युती) तर्फे आयोजित या सोहळ्याचे प्रमुख आयोजक हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर आहेत. तामसा रोडवरील रामलीला मैदान येथे दुपारी १ वाजून ०१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या उपक्रमाद्वारे केवळ खर्चात बचत नाही, तर समाजात बंधुभाव, एकात्मता आणि साधेपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. “समाजातील कुटुंबांना आधार मिळावा आणि साध्या पद्धतीने विवाह लावून एक आदर्श निर्माण व्हावा,” या भावनेतून श...
आ. बाबूराव कदम कोहळीकरांचा शब्दपूर्तीचा मान; हरडफ–देवसरी रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

आ. बाबूराव कदम कोहळीकरांचा शब्दपूर्तीचा मान; हरडफ–देवसरी रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिलेला शब्द पाळत हरडफ–देवसरी या महत्त्वाच्या रस्त्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी युवानेते शरद कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गावातील रस्त्याची दुरवस्था, नागरिकांची गैरसोय याकडे त्यांनी वारंवार आमदारांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून विकासकामांना गती मिळाली आहे. हरडफ ते देवसरी हा रस्ता विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या रस्त्यामुळे दोन्ही विभागांतील नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. केवळ निधी मंजूर करून न थांबता, आमदारांनी काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असून सध्या काम युद्धपातळ...
error: Content is protected !!