Tag: आरोपी

खुनाच्या प्रयत्न प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; १० हजारांचा दंड

खुनाच्या प्रयत्न प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; १० हजारांचा दंड

क्राइम
हदगाव | हदगाव पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात फिर्यादीने दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी रामदास विठ्ठल शिंदे (वय ४७, रा. धानोरा, मु.पो. रूई, ता. हदगाव) याने फिर्यादीस मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२/२०२३ अंतर्गत भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संगिता कदम यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश डॉ. एस. डी. तौशीकर यांनी आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभ...
एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

क्राइम
धर्माबाद/निझामाबाद | क्रिकेट सट्टा प्रकरणात मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला अखेर धर्माबाद व निझामाबाद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरण निझामाबाद येथील 5th Town पोलीस ठाण्यात गु.र.नं. 66/2025 अंतर्गत दाखल असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 61(2), 316(2), 111 तसेच आयटी अॅक्ट 66-D, 69(A) व सह ३, ४ तेलंगणा जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ दरम्यान क्रिकेट सट्टा चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याचवेळी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर (पो.स्टे. धर्माबाद) यांना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी मनोज मानधनी हा धर्माबाद येथे आला आहे. त्यानुसार निझामाबादच्या North Rural CI यांच्या पथकासोबत संयुक्त सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला अ...
नांदेडजवळ कामठा येथे पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

नांदेडजवळ कामठा येथे पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

क्राइम
नांदेड| नांदेड शहराजवळील गाडेगाव रोडवरील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 41 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 11.47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षकांना ‘खबर’ हेल्पलाइनवरून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार 27 मार्च रोजी पथकाने कामठा परिसरात जगनलाल देविलाल यादव यांच्या जागेवरील टिनशेडमध्ये सुरू असलेल्या ‘पपलू’ नावाच्या जुगारावर छापा टाकला. या धाडीत आरोपींकडून: ₹1,50,950 रोकड, 37 मोबाईल फोन, 12 मोटारसायकली असा एकूण ₹11,47,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि संतोष ज...
error: Content is protected !!