बंडानंतर नागेश आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया; “अविश्वासामुळेच निर्णय, विकासासाठी सत्तेची साथ गरजेची”
मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला निर्णय; कार्यकर्त्यांच्या नाराजीकडेही केले लक्षवेध
"पक्षाकडून अविश्वास दाखवला गेला" असा आरोप
विकासकामे रखडल्याने निर्णय घेतल्याचा दावा
"विकासासाठी सत्तेत असणे आवश्यक" अशी भूमिका
"मी कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच आलो" असा खुलासा
नांदेड/हिंगोली | शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला असताना बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरीनंतर प्रथमच आपली भूमिका जाहीरपणे मांडली आहे. पक्ष नेतृत्वाकडून आमच्यावर अविश्वास दाखविण्यात आला, त्यानंतर पक्षात थांबून काहीही साध्य होणार नसल्याचे लक्षात आले. मतदारसंघातील विकासकामे रखडत असल्याने जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन दिवस नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून ...
