Tag: नांदेड

अवैध पिस्टल व खंजरांसह दोन जण ताब्यात, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध पिस्टल व खंजरांसह दोन जण ताब्यात, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| शहरात अवैध हत्यारे बाळगून फिरणाऱ्या दोन इसमांना विमानतळ पोलिसांनी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या मदतीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून पिस्टल, खंजर, दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 8 एप्रिल रोजी कोम्बिंग ऑपरेशन व गस्तीदरम्यान करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन इसम अवैध हत्यारे बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मातागुजरी चौक परिसरात सापळा रचला. संशयितांना अडवून झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल, दोन खंजर, एक मोबाईल फोन व एक पल्सर मोटारसायकल आढळून आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे खुशालसिंग नानकसिंग गिल (वय 22, संभाजीनगर/नांदेड) व जयमितसिंग बलविरसिंग साहू (वय 22, हिंगोली/नांदेड) अशी आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 129/2026 अन्वये भारतीय हत्...
अवैध तलवारीसह सराईत आरोपी ताब्यात, 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध तलवारीसह सराईत आरोपी ताब्यात, 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड| शहरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका सराईत आरोपीस स्ट्रिट सेफ्टी पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून एक लोखंडी तलवार व पल्सर मोटारसायकल असा एकूण 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 8 एप्रिल 2026 रोजी गस्ती दरम्यान करण्यात आली. पोलिसांना मातागुजरी चौक परिसरात एक इसम संशयितरीत्या वावरताना दिसला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव इश्वरसिंग मुखतारसिंग रंघवारा (राहणार अवचल नगर, नांदेड) असे सांगितले. संशयावरून अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक अवैध लोखंडी तलवार आढळून आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 126/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अविनाश कुमार, अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, स्ट्रिट सेफ्टी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक भागवत नागरगो...
तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नांदेडमध्ये दिव्यांगांचा एल्गार

तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नांदेडमध्ये दिव्यांगांचा एल्गार

महाराष्ट्र
नांदेड| दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाविरोधात नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत “आम्हाला गुंडगिरी नको, मुंढेंसारखा प्रामाणिक अधिकारी हवा” अशी भूमिका मांडली. कडक उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव हातात फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नांदेड दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही आंदोलकांनी घेराव घालत आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. निवेदनात मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी, संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मा...
नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज “डिजिटल अवेअरनेस डे” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम घेऊन प्रवाशांमध्ये डिजिटल पेमेंटबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम आणि आदिलाबादसह इतर स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत डिजिटल व्यवहारांचे फायदे, सुरक्षितता आणि सोय यांची माहिती दिली. आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत डिजिटल पेमेंटचा संदेश दिला. दरम्यान, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून तिकीट खरेदीसह रेल्वे सेवांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारून...
नांदेडमध्ये आरोग्य प्रशासनात खळबळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

नांदेडमध्ये आरोग्य प्रशासनात खळबळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

आरोग्य
नांदेड| जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने शासनाने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात प्रशासकीय शिस्तभंग, कार्यातील हलगर्जीपणा आणि नियमांचे पालन न केल्याचे मुद्दे समोर आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा धोक्यात येत असल्याची नोंद वरिष्ठ पातळीवर करण्यात आली होती. निलंबन कालावधीत डॉ. संगीता देशमुख यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना केवळ नियमानुसार भत्ता देण्यात येणार आहे. तसेच या काला...
नांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल

नांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुणांकडून धारदार शस्त्रांचे प्रदर्शन, गुंडगिरीचे व्हिडिओ व भितीदायक पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलाने कडक पावले उचलली आहेत. अशा आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, काही युवक सोशल मीडियावर तलवार, चाकू, कोयते, अग्नीशस्त्रे यांचे प्रदर्शन करत फोटो-व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तसेच चित्रपटातील गुंडगिरीचे गाणे वापरून रील्स तयार करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. काही प्रकरणांमध्ये मृत गुन्हेगारांचे गौरव करणारे व्हिडिओही प्रसारित होत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 मध्ये ...
नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालयाची दयनीय अवस्था; मद्यप्राशन करणाऱ्यांच्या विळख्यात परिसर

नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालयाची दयनीय अवस्था; मद्यप्राशन करणाऱ्यांच्या विळख्यात परिसर

करियर
नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय हे भावी शिक्षक घडविणारे महत्त्वाचे केंद्र असले तरी सध्या या महाविद्यालयाच्या परिसराची दयनीय अवस्था समोर येत आहे. विशेषतः महाविद्यालयाच्या इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीजवळील मोकळी व आडोशाची जागा मद्यप्राशन करणाऱ्या टोळ्यांसाठी अड्डा बनल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. सन 2007 पासून नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या इमारतीत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयात उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, महाविद्यालयाच्या परिसरातील परिस्थिती चिंताजनक आहे. इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीखालील जागा ही मोकळी व आडोशा...
वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

राजकारण
नांदेड | नांदेड शहरात गेल्या 72 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत वाढत्या गुन्हेगारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरात अल्पावधीत इतक्या गंभीर घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी, अगदी शासकीय रुग्णालय परिसरातही हत्यांसारख्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणातील सर्व हत्याकांडांची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्य...
नांदेड रेल्वे विभाग डिजिटल तिकीट व्यवस्थेत आघाडीवर; 70% नॉन-काउंटर व्यवहारांचा विक्रम

नांदेड रेल्वे विभाग डिजिटल तिकीट व्यवस्थेत आघाडीवर; 70% नॉन-काउंटर व्यवहारांचा विक्रम

महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने डिजिटल तिकीट व्यवस्थेत उल्लेखनीय कामगिरी करत आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तब्बल 70% नॉन-काउंटर तिकीट व्यवहार साध्य केले आहेत. हा आकडा संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेतील सर्व विभागांमध्ये सर्वाधिक असल्याने नांदेड विभागाने डिजिटल अंगीकारात आघाडी घेतली आहे. डिजिटल व्यवहारात मोठी झेप नांदेड विभागाने डिजिटल पेमेंट्स आणि पेपरलेस तिकीट प्रणालीचा व्यापक प्रसार केल्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित सेवा उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे UTS (अनारक्षित तिकीट प्रणाली) डिजिटल व्यवहारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 100% वाढ नोंदविण्यात आली आहे. सन्मानचिन्हाने गौरव या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी सिकंदराबाद येथे नांदेड विभागाला सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव केला. डिजिटल व्यवहारांना अधिक चालना देण...
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस; प्रशासनाची उदासीनता चर्चेत

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस; प्रशासनाची उदासीनता चर्चेत

सामाजिक
नांदेड| जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी व मुलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुसऱ्या दिवसाअखेरही दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्नी दैवशाला जगदीश बारदेवाड यांनी आपल्या चिमुकल्यांसह 6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पतीकडून मानसिक छळ, पालनपोषणाचा अभाव आणि गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहण्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: मुलांच्या पालनपोषण व शिक्षणाचा खर्च करावा, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावीत, सेवापुस्तिकेत पत्नी व मुलांची नोंद करावी, कुटुंबासोबत राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, घराचे थकीत हप्ते भरावेत आदी मागण्याचा समवेश आहे. दरम्यान, उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात य...
error: Content is protected !!