Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeमहाराष्ट्रनांदेड रेल्वे विभाग डिजिटल तिकीट व्यवस्थेत आघाडीवर; 70% नॉन-काउंटर व्यवहारांचा विक्रम

नांदेड रेल्वे विभाग डिजिटल तिकीट व्यवस्थेत आघाडीवर; 70% नॉन-काउंटर व्यवहारांचा विक्रम

नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने डिजिटल तिकीट व्यवस्थेत उल्लेखनीय कामगिरी करत आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तब्बल 70% नॉन-काउंटर तिकीट व्यवहार साध्य केले आहेत. हा आकडा संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेतील सर्व विभागांमध्ये सर्वाधिक असल्याने नांदेड विभागाने डिजिटल अंगीकारात आघाडी घेतली आहे.

डिजिटल व्यवहारात मोठी झेप
नांदेड विभागाने डिजिटल पेमेंट्स आणि पेपरलेस तिकीट प्रणालीचा व्यापक प्रसार केल्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित सेवा उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे UTS (अनारक्षित तिकीट प्रणाली) डिजिटल व्यवहारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 100% वाढ नोंदविण्यात आली आहे.

सन्मानचिन्हाने गौरव
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी सिकंदराबाद येथे नांदेड विभागाला सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव केला. डिजिटल व्यवहारांना अधिक चालना देण्यासाठी 08 एप्रिल 2026 रोजी “डिजिटल पेमेंट डे” साजरा करण्यात येणार आहे. याबाबत नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, आदिलाबाद आदी स्थानकांवर जनजागृती मोहीम,  प्रात्यक्षिके, प्रवासी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

प्रवाशांसाठी डिजिटल सुविधा
भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिलेल्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे:nIRCTC Rail Connect – आरक्षित तिकीट बुकिंग, RailOne – एकात्मिक रेल्वे सेवा, BHIM / UPI अ‍ॅप्स – जलद डिजिटल पेमेंट, QR कोड व POS मशीन – स्थानकांवरील सुविधा

डिजिटल व्यवहारांचे फायदे
प्रवास्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही, वेळेची बचत व जलद व्यवहार, रोखरहित व सुरक्षित सुविधा, पारदर्शक व्यवहार, 24×7 उपलब्धता राहणार आहे. नांदेड रेल्वे विभागाने डिजिटल परिवर्तनात नवे मापदंड स्थापित करत प्रवासी-केंद्रित, आधुनिक व कार्यक्षम सेवा देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!