Tag: हदगाव

गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन

गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन

सामाजिक
हिमायतनगर/हदगांव| तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रयत सेवाभावी प्रतिष्ठान, जवळगाव तर्फे मौजे महाताळा (निवघा बाजारजवळ, ता. हदगाव, जि. नांदेड) येथील एका गरजू कुटुंबासाठी मदतीचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे. चि. सौ. का. वैष्णवी गजानन रुमाले हिच्या विवाहासाठी तिच्या आईने प्रतिष्ठानकडे कळकळीची विनंती केली आहे. दिनांक 24 मार्च 2026 रोजी संस्थापक अध्यक्ष सटवाजी गणपतराव पवार (जवळगावकर), अरुण पाटील चक्रीकर व संतोष पाटील सूर्यवंशी यांनी महाताळा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान समोर आलेली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. वधूच्या वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्या वेळी वैष्णवी अवघी 6 वर्षांची, तिची बहीण 4 वर्षांची आणि भाऊ केवळ 2 महिन्यांचा होता. या घटनेनंतर तीन लहान लेकरांची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. घरची परिस्थिती ...
आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

राजकारण
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामागे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील नदीपात्रात पाणी सोडण्याची म्हणी लावून धरली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आह...
वाळकी येथे जागृत देवस्थान माता इसाई देवी यात्रेला प्रारंभ; अखंड हरिनाम सप्ताह सुरु

वाळकी येथे जागृत देवस्थान माता इसाई देवी यात्रेला प्रारंभ; अखंड हरिनाम सप्ताह सुरु

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम हनवते | हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथील जागृत देवस्थान माता इसाई देवीच्या दहा दिवसांच्या यात्रेला 31 मार्चपासून प्रारंभ झाला असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहालाही उत्साहात सुरुवात झाली आहे. माता इसाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशातून दरवर्षी हजारो भाविक येथे येत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती पुजारी विठ्ठल धर्माजी गायकवाड यांनी दिली. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या छबिन्याचा सोहळा 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मध्यरात्री पार पडणार आहे. या वेळी मंदिराला प्रदक्षिणा घालत “जय देवी”च्या जयघोषात हजारो भाविक सहभागी होतात. माता इसाई देवीचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून, मुख्य प्रवेशद्वारासमोर दीपमाळ आहे. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर दीपमाळीत तेल...
हरदडा येथे उद्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

हरदडा येथे उद्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव तालुक्यातील मौजे हरदडा येथे उद्या (दि. ३० मार्च) अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य आयोजिका प्रणिताताई कांबळे यांनी केले आहे. प्रणिताताई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित या परिषदेचा उद्देश बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी विचारांचे प्रबोधन हा आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील ध्वजारोहणाने होणार असून, उपासिका सुजाताबाई अशोक दवणे, शांताबाई शंकर कांबळे व छायाबाई विजयराव कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता दुसऱ्या सत्रास प्रारंभ होईल. या सत्रात भिक्खू संघाची धम्मदेशना भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, आंबेडकरवादी मिशन, नांदेडचे संचालक दीपक कदम यांचेही मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या ...
भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

आरोग्य, राजकारण
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील बरडशेवाळा येथे हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ व ‘पोले इंडोव्हॅस्क्युलर केअर, संभाजीनगर’चे संचालक डॉ. शिवाजीराव पोले यांनी आपल्या जन्मभूमीत हे शिबिर आयोजित केले. हभप मधुकर खोडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त हभप रामेश्वर खोडे महाराज (ईसापुरकर) यांच्या वाणीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान रविवारी (दि. 29 मार्च) या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश मस्के, दंतरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी मस्के यांच्यासह नांदेड येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. त्यामध्ये डॉ. बालाजी नाईक (मधुमेह, थायरॉईड व हार्मोन तज्ज्ञ), डॉ. सूरज जाधव (न्यूरो सर्जन), डॉ. विठ्ठल फड (जनरल फिजिशियन), डॉ. उमेश कानडे (...
झटपट श्रीमंतीच्या आमिषातून शिक्षकाची निर्घृण हत्या; दोघे अटकेत, चालक निर्दोष

झटपट श्रीमंतीच्या आमिषातून शिक्षकाची निर्घृण हत्या; दोघे अटकेत, चालक निर्दोष

क्राइम
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश गुड्डा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कार चालकाला मात्र तपासाअंती निर्दोष घोषित करत मुक्त करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडून गणेश गुड्डा काही संशयितांच्या संपर्कात आले होते. संबंधितांनी मोठी रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याने ते पैसे घेऊन गेले. मात्र पैशांच्या व्यवहाराच्या वेळी आरोपींनी त्यांच्याकडील रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच आरोपींनी त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपींनी गुड्डा यांना जबरदस्तीने कारमध्ये टाकले आणि काही अंतरावर चालत्या वाहनातून खाली फेकून दिले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दा...
error: Content is protected !!