दुष्काळाच्या झळा; तहसीलदारांसह अधिकाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन केली पाहणी

शेतकरी पुत्र दिनेश राठोड यांनी मांडल्या बळीराजाच्या व्यथा; तातडीच्या मदतीची मागणी
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वडगाव (ज), सिबदरा (ज) व खैरगाव (ज) परिसरातील दुष्काळी परिस्थितीची आज तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या पथकाने शेतशिवारात जाऊन पाहणी केली.

यावेळी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर, जिल्हा व तालुका कृषी विभागाचे अधिकारी, पिक विमा कंपनीचे संबंधित अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पुत्र दिनेश राठोड यांनी अधिकाऱ्यांसोबत विविध शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली दयनीय अवस्था अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने पंचनामे, पीक विमा व दुष्काळी मदतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी दिनेश राठोड यांनी केली.

प्रत्यक्ष शेतशिवारात पाहणी झाल्याने प्रशासनाच्या अहवालात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तव प्रतिबिंबित होऊन तातडीने मदत मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!